Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

प्राध्यापक सचिन कारभारी जाधव यांना SPPU , पुणे येथून बँकिंग अँड फायनान्स या विषयात विद्यावाचस्पदी पदवी प्रदान

Responsive Ad Here

पिंपरी-चिंचवड ता.26(दैनिक साम्राज्य न्युज ) येथील प्राध्यापक सचिन जाधव यांनी “ग्राहकांवर आधुनिक बँकिंग तंत्रज्ञानाचा प्रभाव” हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि समकालीन विषय आपल्या संशोधनासाठी निवडला होता . डिजिटल युगात बँकिंग क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर, या बदलांचा ग्राहकांवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी त्यांनी केलेला अभ्यास अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरणारा आहे.

   प्रा.जाधव यांनी २५ एप्रिल २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथून बँकिंग अँड फायनान्स या विषयात   Ph.D पदवी यशस्वीरित्या संपादन केली आहे.

           या उल्लेखनीय यशामागे त्यांचा कठोर परिश्रम, अथक प्रयत्न,चिकाटी आणि अभ्यासातील सातत्यपूर्ण निष्ठा आहे. त्यांच्या संशोधन प्रवासात मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर निकम सर यांचे अत्यंत महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले आहे . त्यांच्या सक्षम मार्गदर्शनामुळे हे संशोधन अधिक परिपूर्ण आणि दर्जेदार बनले.त्यांचे हे संशोधन समाजासाठी, विशेषतः बँकिंग क्षेत्रातील अभ्यासक, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या या यशामुळे आपल्या सर्वांचे नाव अधिक उज्ज्वल झाले आहे.


बातम्या व जाहिरीतीसाठी 

संपर्क :- 9850338185

Email ID- daniksamrajya@gmail.com