Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

माजी नगराध्यक्षा प्राध्यापक अमृता संदीप घोणे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्या वाचस्पती(Ph.D) प्रदान

Responsive Ad Here

 

पुणे ता.27(दैनिक साम्राज्य न्युज ):येथील जेजुरी नगरपरिषदच्या माजी नगराध्यक्षा अमृता संदीप घोणे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेमार्फत “बँकिंग आणि वित्त” या अभ्यास मंडळातून विद्या वाचस्पती (Ph.D.) ही पदवी संपादन केली आहे.

          “पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वित्तीय कामगिरी आणि समभागांचे चिकित्सक अभ्यास” या विषयावर त्यांनी आपले संशोधन यशस्वीरित्या पूर्ण केले. हे संशोधन मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली, व डॉ. डी. वाय. पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पुणे या संशोधन केंद्रातून पूर्ण करण्यात आले. या संशोधन कार्यादरम्यान त्यांनी आपल्या विषयाशी संबंधित एकूण ७ संशोधन पत्रे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्तरावर सादर करून प्रसिद्ध केली आहेत.

             प्रा.अमृता घोणे या जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा असून, महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवस्थानवर विश्वस्त म्हणूनही  काम केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार ) प्रदेश संघटक सचिव म्हणून राज्य कार्यकारिणीवर कार्यरत आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या पक्ष निरीक्षक म्हणूनही त्या कार्यरत आहेत. 

             राजकीय, सामाजिक क्षेत्रातील जबाबदाऱ्या प्रभावीपणे सांभाळत असतानाही त्यांनी शिक्षणाची ओढ जपली.   Pharmacist असणाऱ्या प्रा.घोणे यांनी लग्नानंतर बी.कॉम. व नंतर एम.कॉम. पदवी घेतली.   SET exam, GDC&A उत्तीर्ण झाल्या. तसेच सज्जनगड देव संस्थेच्या  दासबोध ग्रंथावर आधारित परिचय, प्रवेश व परंगत ही पदवी  संपादन करून उल्लेखनीय यश मिळवले आहे.


बातम्या व जाहिरीतीसाठी

संपर्क :- 9850338185

Email ID- daniksamrajya@gmail.com