Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

नगराध्यक्षा अबोलीताई मयूर ढोरे यांच्या शुभहस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

Responsive Ad Here

 

वडगाव मावळ ता. 24(दैनिक साम्राज्य न्युज ):येथील  महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत निधीतून व आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या माध्यमातून  वडगाव नगरपंचायत हद्दीतील केशवनगर मधील प्रभाग क्रमांक १ मधील श्री. आप्पा कदम यांच्या घरापासून ते अर्पण ढोरे पोल्ट्री ते बाबर यांच्या निवासस्थानापर्यंत रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे. प्रभाग क्रमांक १  येथील विकी भोसले यांच्या घरापासून ते सांगवी रस्त्यापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, प्रभाग क्रमांक १ येथील श्री. जगताप यांच्या घरापासून ते सांगवी रोड पर्यंत रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक १ येथील मातोश्री बिल्डिंग ते माळी निवासस्थान ते गुरुकृपा बिल्डिंग ते सांगवी रोड पर्यंत रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे. इत्यादी विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ संपन्न झाला.

           याप्रसंगी नगराध्यक्षा अबोलीताई ढोरे, माजी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, नगरसेवक अजय भवार, नगरसेवक अजय म्हाळसकर, नगरसेवक गणेश म्हाळसकर, नगरसेविका पुनमताई भोसले, नगरसेविका सुनिताताई ढोरे, नगरसेविका वैशालीताई सोनवणे, विकी भोसले, गौतम सोनवणे, अनिल गुरव, गणेश ढोरे, अर्पण ढोरे आणि नगरपंचायत अधिकारी, ठेकेदार तसेच स्थानिक महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

         माजी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांच्या कार्यकाळात या कामांना मंजुरी मिळाली होती. तद्नंतर आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या माध्यमातून या सर्व विकासकामांसाठी सुमारे ६१ लक्ष रुपये इतका भरीव निधी उपलब्ध झाल्याने केशवनगर मधील अनेक रस्त्यांची रुंदीकरणाची कामे मार्गी लागणार आहेत. या होत असलेल्या विकासकामांसाठी नेमलेल्या संबंधित ठेकेदारांना सदरची विकासकामे दर्जेदार पद्धतीने करण्यासाठी नगराध्यक्षा अबोलीताई ढोरे, स्थानिक नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, पुनमताई भोसले यांनी सूचना दिल्या. 

              येणाऱ्या काळात मावळ आमदार शेळके यांच्या माध्यमातून वडगाव कातवीच्या सर्वांगीण विकासासाठी  भरीव निधी उपलब्ध होणार आहे. आज प्रथमता ज्या ज्या प्रभागांमध्ये ही विकास कामे होत आहेत, त्या त्या प्रभागांतील सन्माननीय नगरसेवकांनी नव्याने होणारी हि विकासकामे दर्जेदार पद्धतीने करून घेण्यासाठी जातीने लक्ष देऊन पुढाकार घ्यावा अशी सर्वांना नगराध्यक्षांनी विनंती केली. 

     बातम्या व जाहिरीतीसाठी 

    संपर्क :- 9850338185

Email ID- daniksamrajya@gmail.com