पिंपरी-चिंचवड ता.23(दैनिक साम्राज्य न्यूज ): वाकडकर वस्ती येथील स्थानिक रहिवासी रमेश वाकडकर यांच्या गोठ्यात बांधलेल्या एका वासरावर भटक्या श्वानांच्या झुंडीने भीषण हल्ला केला. त्यामुळे वासराचा जागीच मृत्यू झाला. रविवारी (ता. १९) मध्यरात्री ही घटना घडली.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरात भटक्या श्वानांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रशासनाला वारंवार कळवूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे, ही पहिलीच घटना नसून सुमारे दोन वर्षांपूर्वी याच भागात एका लहान मुलीवर भटक्या श्वानांनी हल्ला केला होता. सुदैवाने त्यावेळी मोठा अनर्थ टळला होता.
या पार्श्वभूमीवर, भटक्या श्वानांसाठी स्वतंत्र आणि प्रभावी धोरण तातडीने राबवावे, वाकड परिसरात विशेष मोहीम राबवून त्यांचा बंदोबस्त करावा, वासराच्या मृत्यूबद्दल रमेश वाकडकर यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशा मागण्या त्यांचे पुत्र विशाल वाकडकर यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे केल्या आहेत .
बातम्या व जाहिरीतीसाठी
संपर्क :- 9850338185
Email ID- daniksamrajya@gmail.com
