वडगाव मावळ(दैनिक साम्राज्य न्यूज) श्री पोटोबा देवस्थान संस्थानच्यावतीने महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिरामध्ये अभिषेक करण्यात आला, तसेच १०० वर्षाची परंपरा जपत सांगवी येथील इंद्रायणी नदी काठी वसलेले जाखमातादेवी मंदिर याठिकाणी वडगाव भजनी मंडळ श्री पोटोबा महाराजांची पालखी घेऊन जातात व भाऊ-बहिण भेटीचा कार्यक्रम संपन्न होतं असतो. यावेळी सांगवी ग्रामस्थ त्याठिकाणी स्वागतासाठी सज्ज असतात.पालखी पोहचल्या नंतर इंद्रायणीनदीवर स्नान होऊन.भाऊ-बहिण भेटीचा सोहळा संपन्न होतो. त्यानंतर भजन,आरती, उपवासाचे फलहार होऊन पालखी पुन्हा वडगांवच्या दिशेने परतीचा प्रवासाला मार्गस्त होतो. यावेळी देवस्थानचे विश्वस्त उपाध्यक्ष गणेश ढोरे, सचिव अनंता कुडे, विश्वस्त किरण भिलारे,चंद्रकांत ढोरे, ॲड. अशोक ढमाले,अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाष जाधव, सुनिता कुडे,काकडआरती भजनी मंडळचे विनेकरी बबन भिलारे, पंढरीनाथ भिलारे, मधुकर पानसरे, सोपान मधुकर म्हाळसकर,विठ्ठल ढोरे,ज्ञानेश्वर म्हाळसकर, देवराम कुडे, रघुनाथ टकले,रविंद्र तुमकर, महादू खांदवे, कैलास खांदवे,बारकू खांदवे,रविंद्र म्हाळसकर,चंद्रशेखर म्हाळसकर, सोपान आगळमे,दत्तात्रय तारू, मयूर गुरव, संतोष गुरव,महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
सुखदेव जाधव
९८५०३३८१८५

