Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

मावळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी शिवाजी असवले तर व्हा.चेअरमनपदी अमोल भोईरकर यांची बिनविरोध निवड

Responsive Ad Here


 वडगाव मावळ (दैनिक साम्राज्य न्यूज) खरेदी-विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून यामध्ये १९ जागांपैकी १६ जागांवर विजय मिळवत महायुतीने एकहाती सत्ता मिळवली. आज चेअरमन, व्हाईस चेअरमन या पदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.

     यावेळी मावळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी शिवाजी असवले तर  व्हाईस चेअरमनपदी अमोल भोईरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडी साठी सहाय्यक म्हणून संघाचे सचिव किरण लोहर यांनी काम पाहिले.

                राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे, बबनराव भेगडे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब नेवाळे यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गुंड, माजी सभापती निवृत्ती शेटे, ज्ञानेश्र्वर दळवी यांच्या एकमताने असवले व भोईरकर यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला, यावेळी सुभाषराव जाधव, दीपक हुलावळे, पंढरीनाथ ढोरे, सुनील भोंगाडे, संतोष मुऱ्हे, सुनील दाभाडे, बाळासाहेब भानुसघरे, दत्तात्रय केदारी, रोहिदास गराडे आदी उपस्थित होते.


दरम्यान चेअरमनपदासाठी असवले यांचा एकमेव तर व्हा.चेअरमन पदासाठी भोईरकर यांच्यासह रमेश भूरुक यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु भुरुक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चेअरमन पदी असवले यांच्यासह व्हा.चेअरमन पदी भोईरकर यांचीही बिनविरोध निवड झाली. 

              यावेळी संचालक भरत येवले, ज्ञानेश्र्वर निंबळे, बाजीराव वाजे, शहाजी कडू, रुपेश घोजगे, माणिक गाडे, किरण हुलावळे, गणेश विनोदे, प्रमोद दळवी, मधुकर जगताप, शरद नखाते, आशा खांडभोर, मनीषा आंबेकर, सुनीता केदारी तसेच एकनाथ येवले, विष्णू घरदाळे उपस्थित होते.


                       बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क  

                          सुखदेव जाधव  ९८५०३३८१८५