Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

श्री दत्त गगनगिरी महाराज पायी ज्योतीचे पुष्पहार अर्पन करुन वडगाव नगरीत स्वागत

Responsive Ad Here


वडगाव मावळ, ता.26:
दत्तजयंती निमित्त श्री दत्त गगनगिरी महाराज यांची पायी ज्योत पुनावळे ते खोपोली या ठिकाणी जात असताना वडगाव नगरीत ज्योतीला पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले.

         यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष अतुल राऊत याच्या हस्ते करण्यात आले.  सर्वांचे स्वागत मावळ विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वहिले यांनी केले.


याप्रसंगी श्री दत्त गगनगिरी सेवा मंडळांचे मार्गदर्शक संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक चेतन भुजबळ, मावळ तालुका खादी ग्रामोद्योग मंडळाचे संचालक सुदेश गिरमे ,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेलचे अध्यक्ष सुधाकर वाघमारे,कामगार नेते हेमंत कोयते, नगरसेवक मंगेश खैरे, ॲड.अजित वहिले ,जय मल्हार ग्रुपचे अध्यक्ष सौरभ सावले,तुषार वहिले,संतोष खैरे, सचिन ढोरे, शैलेश वहिले , हभप विठ्ठल ढोरे,पंकज भामरे, रोहित गिरमे,अभिषेक ढोरे आदी उपस्थित होते. यावेळी जय मल्हार ग्रुपच्या वतीने सर्व उपस्थित भाविकांना सुगंधी दूधचे वाटप करण्यात आले