Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

उद्यापासून वडगाव येथे कार्तिक उत्सवानिमित्त श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

Responsive Ad Here


वडगाव मावळ, ता.२७: वडगाव येथे दि.२८ नोव्हे. २०२३ मंगळवार पासून कार्तिक उत्सवाला सुरुवात होत आहे. त्यानिमित्त मावळ भुषण ह.भ.प.तुषार महाराज दळवी यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमदभागवत कथेचे निरुपण होणार आहे.

           तालुक्याचे श्रद्धास्थान असलेले, वडगावचे ग्रामदैवत तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या वतीने,कालभैरवनाथ कार्तिक जन्माष्टमी उत्सव,सप्ताहाला दिनांक २८/११/२०२३ पासून सुरुवात होत असताना, दररोज पहाटे,५ ते ७ वाजता अभिषेक, सायं. ६ वाजता हरिपाठ व ७ ते ९ वाजता श्रीमदभागवत कथा असे कार्यक्रमांचे स्वरूप असणार आहे.

मंगळवार दि. ५/१२/२०२३ रोजी कालभैरवनाथ जयंती निमित्त रात्री १० ते १२ देवजन्माचे कीर्तन होईल. बुधवार दि.६/१२/२०२३ रोजी सकाळी १० ते १२ काल्याच्या  कीर्तनाने व  दुपारी १२ नंतर महाप्रसादाने संपूर्ण उत्सवाची सांगता होणार आहे.                                                                                         कार्यक्रमाचे नियोजन देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपान म्हाळसकर, विश्वस्त गणेश ढोरे, अनंता कुडे, किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ॲड.अशोक ढमाले, ॲड.तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाष जाधव आणि सुनिता कुडे यांनी केले आहे.