वडगाव मावळ ता.१०: पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडल्या, या नियुक्त्यामध्ये मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यश्रम नेते नवलाख उंबरे गावचे माजी आदर्श सरपंच दत्तात्रय पडवळ यांची सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षापासून तालुकाच्या राजकारणात पडवळ सक्रिय आहेत. तसेच विविध माध्यमातून दत्तात्रय पडवळ सामाजिक कार्यात सक्रिय असताना दिसतात. यापूर्वी त्यांनी हिरानंदानी गॅस उर्जा प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करून तो हद्दपार केला.तसेच एमआयडीसी भागात शेतकरी कुटुंबातील व्यक्तींना तसेच भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाव्या त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
यापूर्वी पडवळ यांनी पक्षाची विविध पदे सक्षमपणे व प्रामाणिकपणे निभावलेली आहेत. नवलाखउंबरे गावचे आदर्श सरपंच म्हणून त्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे. तसेच नवलाखउंबरे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पद भूषवले आहेत. त्याचप्रमाणे स्वयंभू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष असून त्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यात अग्रेसर आहेत. अंदर मावळ विभागात विविध कामांच्या जोरावर सन २०१७ - २१ ची पंचायत समिती उमेदवारी अपक्ष घेऊनही चांगली मते मिळवले परंतु सम चिन्हांमुळे दुर्दैवाने पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु अंदर मावळची जनता आजही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना दिसते व येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेवर सामजिक कार्याच्या जोरावर निवडून येतील याची चर्चा सुरू आहे.
नियुक्तीचे पत्र देताना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर , मावळ तालुक्याचे माजी तालुकाध्यक्ष बबन भेगडे,प्रदेश उपाध्यक्ष संतोष भेगडे, माजी युवा तालुकाध्यक्ष संतोष मुऱ्हे आदी उपस्थित होते.


