वेळेची गरज आणि सामाजिक भान लक्ष्यात घेऊन रक्तदान करूया" या उक्तीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, मावळ तालुक्याचे अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने ग्रामदैवत श्री पोटोबा-जोगेश्वरी यांस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीरात ७५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. महिलांचा देखील रक्तदान शिबिरास उस्पूर्त प्रतिसाद भेटला. प्रत्येक रक्तदात्यास 8 GB पेनड्राईव्ह भेट देण्यात आला. श्री.पोटोबा देवस्थान संस्थान व गरवारे रक्त संकलन केंद्र यांच्या सर्व डॉक्टर्स टिम ने रक्तदान शिबिरास सहकार्य केले.
कार्यक्रमास पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपान म्हाळस्कर, विश्वस्त सुभाष जाधव, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस सुनिल शिंदे, ज्येष्ठ नेते मंगेशकाका ढोरे, माजी सरपंच पोपट वहिले, पांडुरंग दाभाडे, राजेश बाफना, सुनील ढोरे, राजेंद्र कुडे, मंगेश खैरे, चंद्रजित वाघमारे,पंढरीनाथ ढोरे, राहुल पारगे, तुषार भेगडे, सोमनाथ धोंगडे, सुनिता कुडे, सुधा भालेकर, पुजा वहिले, आरती राऊत, बाळासाहेब शिंदे, किसन वहिले, चंद्रकांत राऊत, शांताराम कुडे, सुधाकर वाघमारे, सुरेश कुडे, सुरेश गुरव, बाळकृष्ण ढोरे, बबन कदम, मारुती चव्हाण, नथुराम जाधव, अनिल ओव्हाळ, आफताब सय्यद, संजय शेडगे, गौतम सोनवणे, मयूर गुरव, प्रकाश कदम, भाऊसाहेब ढोरे, किरण ओव्हाळ, गणेश पाटोळे, गणेश ढोरे, शरद ढोरे, शैलेश वहिले,पंकज भामरे, विजय शिंदे, शंकर मोढवे, राहील तांबोळी, प्रणव ढोरे, केदार बवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन पुणे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत,मावळ तालुका युवक अध्यक्ष विशाल वहिले यांनी केले.

