Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

मयुरी चंद्रकांत भांगरे विद्यार्थिनीस तंत्रशिक्षणात ८१.५०% मिळून घवघवीत यश

Responsive Ad Here
तळेगाव दाभाडे, ता.२९: आंबळे येथील दिगवंत गायनाचार्य महादेव भांगरे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भांगरे यांची पुतणी व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भांगरे यांची कन्या मयुरी हिने  इंद्रायणी महाविद्यालयातील तंत्रशिक्षणात ८१.५०% टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.                          मयुरी हीचा  नुकताच  महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, सचिव अनुराधा ओक यांच्या हस्ते गुणगौरव करून सत्कार करण्यात आला. 
               अनुराधा ओक बोलताना विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिगत  विकासावर विशेष भर द्यावा. तसेच इतर अनेक गोष्टींमध्ये सुद्धा प्रावीण्य  मिळवत आयुष्यात मोठी झेप घ्यावी असे सांगितले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान व तंत्रशिक्षण परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाने आयोजित केलेल्या गुणगौरव समारंभात त्या बोलत होत्या. 
               यावेळी  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह चंद्रकात शेटे होते. तसेच संस्थेचे संचालक संदीप काकडे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय आरोटे,प्राध्यापक,शिक्षक,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.