वडगाव मावळ, ता.०९: मोरया प्रतिष्ठान व यशराज इंटरप्राईजेस यांच्या माध्यमातून वडगाव शहरात सुरू करण्यात आलेल्या "आपले सरकार नागरी ई सुविधा केंद्र" चे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष जाधव यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.
वडगाव शहरातील रहिवाशांना आपले सरकार केंद्रातून डिजिटल पद्धतीने दर्जेदार सेवा देण्यात येईल. तसेच केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणाहून सर्व सेवा अतिशय अल्प दरात उपलब्ध होतील. सर्व प्रकारचे दाखले, अर्ज व इतर ऑनलाईन सेवा देण्यासाठी हे केंद्र सोईचे ठरेल असे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी मत व्यक्त केले.
आपले सरकार सेवा केंद्रातून सर्व ऑनलाईन सेवा, आधार कार्ड, पॅनकार्ड, शैक्षणिक दाखले, शेतकऱ्यांचे कर्जमाफी अर्ज, सातबारा, आठ अ, रेशनिंग कार्ड यासह अन्य सेवाही या केंद्रातून मिळणार आहे़.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष जाधव, नगराध्यक्ष मयूर ढोरे, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर, वि.म.शिंदे गुरुजी, गोरख ढोरे, लक्ष्मण ढोरे सुरेश कुडे, नितीन भांबळ, नगरसेविका पूनम जाधव, माया चव्हाण, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, मंगेश खैरे, वडगाव शहराध्यक्ष प्रवीण ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष अतुल वायकर, यशराज इंटरप्राईजेस दादासाहेब जावेर,राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष विशाल वहिले, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल कार्याध्यक्ष अतुल राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सचिन कडू, वडगाव राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल अध्यक्ष मजहर सय्यद, अमर चव्हाण, सिद्धेश ढोरे आदी उपस्थित होते.

