Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

भरदिवसा हल्लेखोरांचा किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला, उपचारापूर्वी आवारे यांचे निधन

Responsive Ad Here


 भरदिवसा हल्लेखोरांचा किशोर आवारे यांच्यावर प्राण घातला हल्ला उपचारापूर्वी आवारे यांचे निधन 

काही दिवसापूर्वी शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांचीही भरदिवसा हत्या करण्यात आली होती. 

महिन्याभरात हल्लेखोरांची ही दुसरी घटना

तळेगाव दाभाडे, ता.१२: येथील तळेगाव नगरपरिषदेच्या आवारात जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर पाळत ठेवून बसलेल्या चार अज्ञातखोरांनी गोळीबार करून कोयत्याने डोक्यात वार केले. काही क्षणात आवारे रक्ताच्या थारोळ्यात पडले तरीही हल्लेखोर काहीवेळ तेथेच थांबूनच राहिले जखमी अवस्थेत असणाऱ्या आवारे यांना त्वरित सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली.

            जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून किशोर आवारे यांनी मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्याला हात घालत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम हाती घेतले होते. तसेच काही दिवसापूर्वी सोमाटणे टोलनाका असेल,कोविडकाळामध्ये विविध घटकांना केलेली मदत असेल, एसटी कामगारांचे आंदोलन,अपंग व्यक्तींना निधी मिळवून देण्यासाठी केलेली मदत, त्याचप्रमाणे रिक्षा चालक अशा समाजातील विविध घटकांसाठी आवरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अशा व्यक्तीची भरदिवसा निर्घृण हत्या  होणे ही मोठी शोकांतिका आहे. मावळ तालुक्यात अशा घटनेचा जनतेकडून  खेद व्यक्त होेत आहे. अशा घटनेने तळेगाव सह मावळात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.