Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

पिंपळोली गावचे सुपुत्र अक्षय पिंपळे यांची रेल्वेतील कमर्शियल कम टिकीट क्लार्क (TC)या पदावर नियुक्ती

Responsive Ad Here


वडगाव मावळ, ता.६: मावळ तालुक्यातील पिंपळोली गावचे सुपुत्र अक्षय पिंपळे यांची भारतीय रेल्वेत घेतल्या जाणाऱ्या नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी परीक्षेच्या माध्यमातून कमर्शियल कम टिकीट क्लार्क(TC) या पदावर नियुक्ती झाली आहे. आज या परीक्षेचा निकाल लागला. अक्षयने या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून सरकारी सेवेत नोकरीचे स्वप्न पूर्ण केले आहे. मावळ तालुक्यातील आणि विशेषता ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचे यश नक्कीच प्रेरणादायी ठरेल. 

             फेब्रुवारी २०१९ मध्ये रेल्वे मार्फत ह्या परीक्षेची जाहिरात निघाली होती. या परीक्षेचा पहिला टप्पा जानेवारी २०२१ मध्ये तर दुसरा टप्पा जून २०२२ मध्ये झाला होता. व तिसरा मेडिकलचा टप्पा मार्च २०२३ मध्ये झाला होता. या तीनही टप्प्यात  अक्षयने घवघवीत यश संपादन केले आहे. अक्षय हा पिंपळोली गावातील साधारण शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. ग्रामीण भागातूनही मुले स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतात हे त्याने दाखवून दिलेले दिले आहे. 

            पिंपळोली गावचे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. अक्षयने त्यात आणखी एक परीक्षा पास होऊन  त्या इतिहासात मानाचा तुरा रोवला आहे.ग्रामीण शेतकरी कुटुंबातील युवकांनी भारतीय रेल्वेत मिळवलेल्या पदाबद्दल त्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. 

       जिद्द चिकाटी आणि परिश्रमाला अभ्यासाची जोड दिली की अवघड गोष्टीही सोप्या होतात त्याच्या या यशात कुटुंबीय मित्रपरिवार व हितचिंतकांची हितचिंतकांचा मोलाचा वाटा असल्याचे अक्षय सांगतो.