वडगाव मावळ, ता.०४: कशाळ येथील मळुबाई मंदिर परिसर कॉक्रीटीकरणसाठी भारतीय जनता पक्षाचे तालुकध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या विशेष प्रयत्नाने व ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ जाधव यांच्या पाठपुराव्याने १० लक्ष निधी मळुबाई मंदिर परिसर कॉक्रीटीकरणासाठी मंजुर झाला. त्याचे आज (ता.०४) भुमिपुजन पार पडले.
यावेळी कशाळ गावचे माजी पोलीस पाटील बारकु जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण जाधव,ग्रामपंचायत सदस्य सुभाष जाधव,बाळासाहेब जाधव, गबळु पांडु जाधव, माजी अध्यक्ष बाळासाहेब जाधव, अनिल जाधव,भरत जाधव, बजरंग जाधव शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष रामकृष्ण जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ जाधव यांनी बोलताना मळुबाई मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी आणखी निधी उपलब्ध होणार आहे असे प्रतिपादन केले.

