Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तळेगाव दाभाडे शाखेच्या नूतनीकरणाचा समारंभ संपन्न

Responsive Ad Here

 


 तळेगाव दाभाडे, ता.७:येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  शाखेचा नूतनीकरणाचा समारंभ तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाला.  पीडीसीसी बँक ही प्रामुख्याने शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी हात देणे हे जिल्हा बँकेचे मुख्य ध्येय असून याच ध्येयाने बँकेची यशस्वी वाटचाल सुरु आहे.उत्कृष्ट बँकिंग सेवा देताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्याप्रमाणात होत असल्याने ग्राहक व ठेवीदारांचा जिल्हा बँकेवरील विश्वास अधिक दृढ होईल असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांनी यावेळी सांगितले.

     


            तसेच नूतनीकरणामुळे ग्राहकांना अद्ययावत बँकिंग सुविधा मिळेल.बँकेच्या पारदर्शक कारभाराची भरभराट व्हावी व सर्वसामान्यांना याचा  लाभ मिळावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असे पीडीसीसी बँकचे विद्यमान संचालक  माऊली दाभाडे यांनी बोलताना सांगितले.
         
       यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, पीडीसीसी बँक अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे,  पीडीसीसी बँक विद्यमान संचालक माऊली दाभाडे,  उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, पीडीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष बबन भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे,  सीईओ अनिरुद्ध देसाई, अंकुश उभे, रवींद्र जोशी, माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके , माजी पंचायत समिती सदस्य  दिपक हुलावळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, माजी नगरसेविका वैशाली दाभाडे, माजी सरपंच संदीप काशीद, विभागीय अधिकारी गुलाब खांदवे, नितीन देशपांडे, संभाजी शिंदे , शांताराम लष्करी, तसेच तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, संचालक आदि उपस्थित होते.