Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

मोरया प्रतिष्ठान व नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पुढाकाराने मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी PMPL बस पास सेवा केंद्र सुरू

Responsive Ad Here

  



वडगाव मावळ,  ता.०३: पुणे जिल्हा परिषदेचे  कृषी व पशसंवर्धनचे माजी सभापती बाबुराव वायकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोरया प्रतिष्ठान  नगराध्यक्ष मयूर  ढोरे यांच्या पुढाकारातून मावळ तालुक्यातील विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य जनतेसाठी पीएमपीएमएल पास सेवा केंद्राचे माजी सभापती बाबुराव वायकर यांच्या उपस्थितीत PMPL चे चीप ट्रान्सपोर्ट मॅनेजर सतीश गव्हाणे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

         मावळ तालुक्यात PMPL ची बस सेवा निगडी-वडगाव मावळ, निगडी-लोणावळा, निगडी ते टाकवे, निगडी ते नवलाख उंब्रे, निगडी ते उर्से, निगडी ते गहुंजे या मार्गावर चालू असते. त्यातच वडगाव शहरात तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, पोलीस ठाणे, विविध शासकीय कार्यालये, बँका, शैक्षणिक संस्था आहेत. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, चाकण येथील शासकीय कार्यालये, उद्योग व्यवसाय, शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग व्यावसायिक, विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिकांना कामासाठी ये-जा करावी लागते. 

     अनेक कर्मचारी वडगावात राहत असून, तालुक्यातील मोठ्या संख्येने कर्मचारी इतर नागरिक बसने प्रवास करत असतात. या सर्वांना सवलतीचा पास घेण्यासाठी निगडी येथे जावे लागत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय व अर्थिक नुकसान होत असल्याने आता या नवीन झालेल्या पास केंद्रामुळे तालुक्यातील नागरिकांचा सवलत पास साठी जाणारा वेळ, अर्थिक नुकसान तसेच गैरसोय थांबणार आहे.

            यावेळी संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष  बापूसाहेब भेगडे, PMPL चे चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर श्री. सतीश गव्हाणे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, मावळ तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेवक राजेंद्र  कुडे, निगडी पास विभाग प्रमुख नितीन घोगरे, डेपो मॅनेजर शांताराम वाघिरे, वाहतूक नियोजन अधिकारी वर्पे , आंदर मावळ प्रवासी संघ अध्यक्ष राजूभाऊ शिंदे, वाहतूक नियोजन अधिकारी विजय रांजणे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील चव्हाण, माजी सरपंच तुकाराम असवले, नगरसेवक मंगेश खैरे, वडगाव शहर काँग्रेस आय अध्यक्ष गोरख  ढोरे, वडगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अतुल वायकर,  बारकू ढोरे, दिलीप वहिले, माजी चेअमन चंदुकाका ढोरे, अर्जुन  ढोरे, नितीन भांबळ, सुरेश कुडे, कार्याध्यक्ष सुरेश जांभुळकर, युवराज ढोरे, उपाध्यक्ष सोमनाथ भोसले, सचिन कडू, वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष मजहर सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस वडगाव शहर ओबीसी सेलचे अध्यक्ष मयूर गुरव, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष प्रणव ढोरे, यश चव्हाण, सोमनाथ धोंगडे, गौतम सोनवणे, गिरीष सावले आदी उपस्थित होते.


नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी स्वखर्चातून दिलेल्या या पास केंद्राचा तालुक्यासह वडगाव शहरातील विद्यार्थी, कामगार वर्ग, ज्येष्ठ नागरिक ते सर्वसामान्य जनतेला कायमस्वरूपी लाभ मिळणार आहे.