Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

वडगावमध्ये गुरुवारपासून श्री पोटोबा महाराज उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

Responsive Ad Here


वडगाव मावळ, ता.०४: मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान, ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांच्या चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त ६ व ७ एप्रिल रोजी विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर व उत्सव समितीचे अध्यक्ष संजय दंडेल यांनी दिली.


उत्सवानिमित्त गुरुवारी (ता. ६) पहाटे चार वाजता श्री. पोटोबा महाराजांचा अभिषेक, सकाळी सहा वाजता श्री हनुमान जन्मोत्सव, स. (छबिना), दुपारी चार वाजता मानाच्या काठ्या, ५वाजता मानाचे बगाड, रात्री ८ वा. शोभेचे दारूकाम, रात्री ९ वा. भजन स्पर्धा होईल. स्पर्धेतील विजेत्या प्रथम पाच क्रमांकांना बक्षिसे दिली जाणार आहेत. याशिवाय उत्कृष्ट गायक,वादक व हार्मोनिअम वादक यांना वैयक्तिक पारितोषिके व प्रत्येक सहभागी संघास दोन हजार रुपये व सन्मान चिन्ह दिली जाणार आहेत. मनोरंजनाच्या कार्यक्रमात रात्री ८ वा. अभिनेत्री संजना काळे व सहकाऱ्यांचा लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. 


शुक्रवारी (ता. ७) सकाळी पालखी ज्ञान अमृत वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील बाल भजनी मंडळाच्या सहभागाने पालखी मिरवणूक, दुपारी ४ वाजता डी. एड. कॉलेजच्या मैदानावर कुस्त्यांचा आखाडा होईल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात रात्री आठ वाजता बॉलिवूड नाईट हा गाणी व नृत्याचा कार्यक्रम होईल. देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश ढोरे, सचिव अनंता कुडे, खजिनदार चंद्रकांत ढोरे, सुभाष जाधव, तुकाराम ढोरे, किरण भिलारे, अरुण चव्हाण, अशोक ढमाले, तुकाराम काटे, सुनिता कुडे, मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे अध्यक्ष संजय दंडेल, कार्याध्यक्ष सचिन कराळे, शिवाजी येळवंडे, कार्यक्रम प्रमुख बाळासाहेब तुमकर, अनिकेत भगत, अक्षय रौंधळ, संकेत चव्हाण, खंडू जाधव, केदार बवरे, समीर ढोरे, संतोष ढमाले अनिल कोद्रे, सुधीर ढोरे, सोमनाथ धोंगडे, सुहास विनोदे, आदींनी संयोजन केले आहे.