वडगाव मावळ ता.०३: मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची सन २०२३-२८ निवडणूका पार पडणार आहे. आंदर मावळ मधील कशाळ येथील शेतकरी कुटुंबातील युवक माजी सरपंच विठ्ठल जाधव यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी खादी ग्रामोद्योगचे माजी चेअरमन अंकुश आंबेकर , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास मालपोटे, माजी चेअरमन मारुती खांडभोर, माजी आदर्श सरपंच शरद जाधव, माजी सरपंच मदन अडीवळे, माजी उपसरपंच तुकाराम जाधव, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक उत्तम शिंदे, माजी सरपंच मारुती खामकर , ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ असवले, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक बाळासाहेब जाधव मुकुंद जाधव , श्री मळुबाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत जाधव , दशरथ जाधव , सुनिल जाधव, राष्ट्रवादीचे तालुका सचिव मंगेश जाधव, दत्तात्रय जाधव व आदी उपस्थित होते.

