वडगाव मावळ, ता.१६: येथील निगडे ग्रामपंचायत व लाईफ व्हिजन मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निगडे ग्रामपंचायत मध्ये. मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. शिबिरामध्ये एकूण १९५ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. ३५ रुग्णना मोतीबिंदू आढळला. त्याचे ऑपरेशन मोफत होणार असल्याचे सांगण्यात आले. शिबिरामध्ये डोळ्यांची घ्यावयाची काळजी व त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्यमान सरपंच भिकाजी भागवत, उपसरपंच गणेश भांगरे , लाईफ व्हिजन मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष महेश पाटील, डॉ.किरण सिंहमर, डॉ. माधव मधुकर,विजया भामरे , तालुका सन्मवयक वैशाली आठवले,सहाय्यक पल्लवी आगे आदी नागरिक उपस्थित होते.

