Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

स्व.केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात ११ नवदापत्य विवाहबद्ध

Responsive Ad Here

 


रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद



हळदी समारंभास वरून राजाची हजेरी



गेल्या १० वर्षामध्ये सामुदायिक विवाह सोहळ्यात १५० वधू वर विवाहबद्ध



आमदार सुनील शेळके यांना समाज भूषण पुरस्काराने गौरव तर अतुल राऊत यांना कर्तव्यनिष्ठ पुरस्कार गौरवण्यात आले.




वडगाव मावळ,ता.१८: येथील स्वर्गीय केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा रविवार (ता.१६) रोजी संपन्न झाला या सोहळ्यात ११ वर वधू विवाहबद्ध झाले विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामदैवत पोटोबा महाराज प्रांगणात विवाह सोहळा संपन्न झाला. विवाह सोहळ्याची सुरुवात श्री पोटोबा महाराजांच्या अभिषेकने झाली. तसेच स्व. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिर संपन्न झाले. दुपारी बारा वाजता वधू वर यांचा साखरपुडा संपन्न झाला.यावेळी कुलस्वामिनी महिला मंचाच्या अध्यक्षा सारिका शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस महीलाध्यक्ष दिपाली गराडे, पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपान म्हाळसकर यांनी शुभेच्छा तर नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी स्वागत केले.

   


    तसेच वधू-वराचा दुपारी हळदी समारंभ पार पडला. हळदी समारंभ मध्येवरून राजाची हजेरी लावली. त्यानंतर भोजनाचा आस्वाद घेतला गेला. बॅन्ड,बग्गी रथातून, वाजंत्री सह मिरवणूक काढण्यात आली.

          यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके यांना समाज भूषण पुरस्काराने गौरव आले.तर अतुल राऊत यांना कर्तव्यनिष्ठ पुरस्कार गौरवण्यात आले.



        लग्नप्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता सायंकाळी सुंदर वातावरणात विवाह सोहळा पार पडला.

  यावेळी माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना, आमदार सुनील शेळके, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माऊली दाभाडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना चे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, संत तुकाराम शिक्षण मंडळाचे सचिव अशोक बाफना,माजी सरपंच बाळासाहेब ढोरे,नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपानगराध्यक्षा सायली म्हाळसकर,संत तुकाराम सहकारी साखर कारखानाचे संचालक सुभाष जाधव, पोलीस निरीक्षक विलास भोसले, माजी सरपंच दत्ताञय पडवळ,खादी ग्रामोद्योगचे माजी चेअरमन अंकुश आंबेकर आदीच्या उपस्थितीत ११ वधू वर विवाहबध्द झाले.



        यावेळी संस्थेचे संस्थापक  पंढरीनाथ ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विवाह  सोहळा २०२३ चे अध्यक्ष गणेश विनोदे,कार्याध्यक्ष सदाशिव गाडे, कार्यक्रमप्रमुख विवेक गुरव,उपाध्यक्ष शंकर ढोरे, खजिनदार अनिल कोद्रे, सचिव अक्षय बेल्हेकर, महेश तुमकर प्रतिष्ठानचे पदाधिकारी अर्जुन ढोरे, राजेंद्र कुडे, राजेश बाफना, गणेश ढोरे, डॉ.प्रा.सुधीर ढोरे आदी उपस्थित होते. 

    


    कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंढरीनाथ ढोरे यांनी केले सुञसंचालन शरद ढोरे, अतुल राऊत, प्रवीण ढोरे यांनी केले व प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व सदस्यानी संयोजन केले.