तळेगाव दाभाडे, ता. १५: आंबळे येथील शालेय विद्यार्थ्यांना १६ सायकल व शालेय साहित्याचे हसको हायड्राॕलिक्स कंपनीतर्फे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्याना १६ सायकल, स्कुल बॕग ,वाॕटर बाॕटल व स्कुल शुजचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना कायम कंपनीतर्फे सहकार्य राहते त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना जडणघडणीसाठी मार्ग मिळतो.
यावेळी हसको कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत मोरे, सरपंच मोहन घोलप,शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुर्यकांत भांगरे, प्रमिला बाबर, सुरेखा पानसरे मुख्याध्यापक संदीप कांबळे, चंद्रकांत हुंडे,वंदना आल्हाट आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत हुंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार वंदना आल्हाट यांनी मानले.

