वडगाव मावळ, ता.९: मावळ तालुक्यातील आंद्रा धरणग्रस्त शिरे-शेटेवाडी येथील ग्रामस्थांना २३ वर्षांच्या संघर्षानंतर २००५ च्या रेडी रेकनर नुसार प्रत्येकी दोन गुंठे प्रमाणे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थित प्लॉट वाटप करण्यात आले.
यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, सूर्यकांतजी वाघमारे, बाळासाहेब गावडे, माजी उपसभापती शांताराम कदम,एकनाथ टिळे, ज्ञानेश्वर दळवी, गुलाब म्हाळस्कर, गणेश गायकवाड, गणेश कल्हाटकर , शिवसेना प्रमुख राजू खांडभोर, सायली बोत्रे,गणेश भांगरे, अभिमन्यू शिंदे,सागर शिंदे, अमोल भोईरकर यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त लाभार्थी उपस्थित होते.


