तळेगाव दाभाडे, ता.९: येथील वराळे गावातील नळ पाणीपुरवठा योजना व विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार सुनील शेळके व मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
जल जीवन मिशन अंतर्गत वराळे पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 31 कोटी 48 लक्ष रु.निधी उपलब्ध झाला आहे.या निधीतून सुमारे 27 किलोमीटर अंतर्गत पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.तसेच भिसे कॉलनी येथे ५ लक्ष लिटर क्षमतेची, कोहिनूर सोसायटी येथे ९ लक्ष लिटर क्षमतेची, तिरुमला सोसायटी येथे ५ लक्ष लिटर क्षमतेची आणि वराळे गावठाण येथे ५ लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे.त्यामुळे संपुर्ण गावात मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.
वराळे गावामध्ये नागरिकीकरण वाढत आहे.मोठमोठे गृह प्रकल्प उभारले जात आहेत.येथे येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी भविष्याचा विचार करुन विकास कामे झाली पाहिजेत.त्या दृष्टीने रस्ते,पाणी पुरवठा अशी कामे होत आहेत. गावाच्या विकासाला हातभार लावण्याची जबाबदारी माझी देखील आहे.विकास कामांमध्ये कोणी राजकारण आणण्याचा प्रयत्न करु नये.आजपर्यंत ज्या विश्वासाने काम करण्याची संधी दिली.तशीच पुढील काळात देखील द्याल ही अपेक्षा बाळगतो.गावातील भविष्यात जी कामे करावयाची असतील ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करील असे बोलताना आमदार सुनील शेळके यांनी आश्वासन दिले.
यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बबन भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी सभापती विठ्ठल शिंदे, पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व कृषी संवर्धनाचे सभापती बाबुराव वायकर, कृषी उत्पन्न समितीचे माजी अध्यक्ष बबन भोंगाडे,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, माजी सरपंच दत्तात्रय पडवळ, सुनील दाभाडे, सरपंच शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर सातकर, माजी सरपंच ज्ञानेश्वर मराठे,विश्वनाथ मराठे, काळूराम मराठे,रोहीदास मराठे, माजी चेअरमन दत्तात्रय मराठे,निलेश मराठे, शहाजी मराठे, तुकाराम मराठे,माजी उपसरपंच संतोष मराठे, विद्यमान उपसरपंच अभिजित मराठे,निलेश मराठे, गणेश मराठे, माजी उपसरपंच विशाल मराठे,पोलीस पाटील दीपक शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य कल्पेश मराठे ,विकास मराठे, तालुका सरचिटणीस अतुल मराठे, अमर मराठे,जितू मराठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


