Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

वडगावमध्ये विविध ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

Responsive Ad Here


वडगाव मावळ, ता.११: समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९६ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. फुलेनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला समाज सुधारण्यासाठी महात्मा फुले हे एक प्रेरक मंत्र आहेत. महात्मा फुले यांची विचारसरणी युवकांनी आमलात आणणे आवश्यक आहे.

        


          वडगाव येथील कला, वाणिज्य व बी.बी.ए.महाविद्यालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी झाली.यावेळी महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक महादेव वाघमारे यांनी कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनी यांना फुले यांचे जीवनचरित्र उलगडण्याचा प्रयत्न केले. 

        यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक गायकवाड, प्रा. महादेव वाघमारे, प्रा.डॉ.शितल दुर्गाडे, प्रा.शितल शिंदे, प्रा.गजानन वडूळकर, प्रा.योगेश जाधव, प्रा.सुखदेव जाधव, प्रा.डॉ.जया डावरे,प्रा.अशोक कोकळे,प्रा.मोहिनी ठाकर, प्रा.सुप्रिया पाटोळे आदी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.



       येथील वडगाव नगरपंचायत येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक प्रबोधनाचे कार्य करीत असताना सर्व समाजाचा विकास होईल असे फुलेंचे कार्य आहे.महाराष्ट्राला कृतीशील असा वैचारीक वारसा देणारे, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, महान समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. 

      यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, किरण म्हाळसकर आणि नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

      


       वडगाव येथील अध्यापक महाविद्यालयात कार्यक्रमामध्ये इतिहास संशोधक डॉ. प्रा. प्रमोद बोराडे यांनी बोलताना सांगितले की आजची तरुण पिढीने महात्मा ज्योतिबा फुलेंचा आदर्श घ्यावा.कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता धायगुडे, प्रा. महादेव सांगळे, डॉ. प्रा.संदिप गाडेकर, डॉ. प्रा.शितल देवलालकर, प्रा.कविता तोटे,प्रा. सोनाली पाटील, प्रा. सुजाता जाधव मॅडम आदी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.