वडगाव मावळ, ता.१८: येथील वडगाव शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने दिलेल्या सुचनेनुसार वडगाव शहर भाजपा महीला मोर्चा अध्यक्षा धनश्री भोंडवे यांच्या पुढाकाराने 'समरसता स्नेहभोजनाचे' आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शहरातील अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स,अंगणवाडी मदतनीस आणि कायदेतज्ज्ञ महिलांचा उपस्थित होत्या. भारत सरकारद्वारे महिलांसाठी राबविण्यात आलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला.योजना राबविताना देण्यात येणारे लाभ व प्रत्यक्षात काम करताना येणाऱ्या अडचणींवरही चर्चा झाल्या. अंगणवाडी सेविकांनी व आशा वर्कर्सनी समस्या मांडताना अंगणवाडी व आरोग्य सुविधांबाबत ज्या गोष्टींची शहरात गरज आहे त्याविषयी आपापली मते व्यक्त केली.महिलांविषयक बदललेल्या व नवीन कायद्यांची ॲड.शकुंतला वाडेकर यांनी माहिती दिली. त्यानंतर महिलांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
यावेळी वडगाव मावळ भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा धनश्री भोंडवे, मावळ तालुका भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस वैशाली ढोरे, मनिषा ढोरे,मिना ढोरे,मंगल जाधव, सोनाली पांडागळे, सुजाता चांदेकर,भाग्यश्री टपाले,उज्वला ठोंबरे या आशा वर्कर्स सह शकुंतला नागे व निलम दिवाडकर आदी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
