Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

शिवकालीन मर्दानी खेळात दगडी गोटी उचलण्याच्या खेळात २७० बैठका मारून सुरेंद्र भिलारे ठरले चांदीच्या गदेचा मानकरी

Responsive Ad Here

 वडगाव मावळ(पुणे): येथील दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी दगडी गोटी उचलण्याचा शिवकालीन खेळाचे आयोजन करण्यात येत असते यावर्षी सुरेंद्र भिलारे याने तब्बल २७० बैठका मारून पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान तर्फे  चांदीची गदा मिळवण्याचा मान मिळवला तसेच शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आकर्षक बक्षिस देण्यात आले त्याचप्रमाणेे मोरया प्रतिष्ठान व नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्यातर्फे चांदीचे कड बक्षीस देण्यात आलं.



      कार्यक्रमाप्रसंगी मावळचे आमदार सुनील शेळके   ग्रामदैवत पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपान म्हाळसकर , गणेश ढोरे, सभापती बाबुराव वायकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर, भास्करराव म्हाळसकर, विठ्ठलराव भोसले, राजेंद्र कुडे ,पंढरीनाथ ढोरे ,प्रवीण चव्हाण, बाळासाहेब म्हाळसकर, अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे, सुनील चव्हाण , बिहारीलाल दुबे, शिवजयंती उत्सवाचे अध्यक्ष दिनेश ढोरे, जय बजरंग तालीमचे अध्यक्ष उमेश ढोरे, यावेळी माजी रवींद्र यादव, अविनाश चव्हाण आदी उपस्थित होते.

           सुरज म्हाळसकर यांनी ८८ बैठकी मारून दुसरा क्रमांक मिळवला, अक्षय म्हाळसकर याने ७५ बैठकी मारून तृतीय क्रमांक मिळवला , याशिवाय पवन ढोरे यांनी ७२,किशोर धोत्रे यांनी ६० , तेजस भिलारे ५१,  आर्यन ढोरे ५०, यश चव्हाण ४५, विनीत वहिले २०


बैठक्या मारून उल्लेखनीय कामगिरी केली.

    मनसेचे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी R फिटनेस जिम तर्फे विजेत्यांना विशेष बक्षीस दिले.

 सुनील चव्हाण, अनंता कुडे व राजेंद्र म्हाळसकर यांनी सूत्रसंचालन केले व किरण भिलारे यांनी आभार मानले.