Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

जागतिक महिला दिनानिमित्त पिंपळखुटे येथे 'तु-हि कर्तबगार' सन्मान सोहळा साजरा - माजी उपसरपंच कमल गराडे यांच्या सुप्त उपक्रम

Responsive Ad Here

 



वडगाव मावळ: जागतिक महिला दिनानिमित्त बेबडओहोळ-पिंपळखुटे ग्रामपंचायत हद्दीतील राजकीय, सामाजिक, शिक्षण, आरोग्य अशा विविध विभागात कार्य केलेल्या महिलांचा 'तु-हि कर्तबगार' म्हणून विशेष सन्मान करून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


माजी उपसरपंच कमल रोहिदास गराडे यांच्या पुढाकाराने पिंपळखुटे येथील श्री हनुमान मंदिरात आयोजित केलेल्या या सन्मान सोहळ्यास रोटरी क्लब ऑफ निगडीच्या कमलजीत कौर, उपस्थित होत्या. यावेळी गावातील ३० महिलांना 'तु-हि कर्तबगार' सन्मान प्रदान करण्यात आला.


यामध्ये माजी सरपंच सुशीला जाधव, अर्चना घारे, सारिका घारे, सुषमा गायकवाड, सविता सप्रे, माजी उपसरपंच सुनीता घारे, नम्रता घारे, मनीषा घारे, कविता ढमाले, संध्या शिंदे, लताबाई गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्या शोभा गायकवाड, मालाबाई गायकवाड, सुजाता गराडे, नंदा गराडे, कल्पना गराडे, पोलीस पाटील दुर्गा घारे, कात्रज दूध डेअरीच्या मॅनेजिंग डायरेक्टर माधुरी ढमाले, मुख्याध्यापिका नीलम साळुंखे, शिक्षिका अर्चना भरगंडे, कल्पना देशमुख, सुनीता शेळके, अंगणवाडी सेविका जयश्री मारणे, आशा घारे, शामल गराडे, नयना घारे, उज्वला पायगुडे, निमा हिंगे, स्वयंसेविका सुजाता घारे, सुषमा थोरवे, वैशाली गायकवाड या महिलांचा सन्मान करण्यात आला.



माजी उपसरपंच कमल गराडे म्हणाल्या, गावाच्या जडणघडणीत महिलांचा सहभाग महत्वाचा असतो, ग्रामपंचायत, शिक्षण, सहकार, आरोग्य अशा विविध विभागात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात व गावच्या विकासाला हातभार लावतात. त्यामुळे महिलादिनी अशा कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला असल्याचे सांगितले.