वडगाव मावळ ता.२३: गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षानिमित्त मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरात भव्य शोभायात्रा आयोजन करण्यात आले होते.नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या संकल्पनेतून मोरया प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.या शोभायात्रेचा शुभारंभ मावळ तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
शहरातील साईनाथ मित्र मंडळाच्या वतीने स्वतःहून एक चित्ररथ सहभागी केला होता. शोभायात्रा मिरवणूक मार्गावर शहरातील व्यापारी बांधवांनी पुष्पृष्टी करत शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी वडगाव शहरातील सर्वच गणेशोउत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शोभयत्रेस विशेष सहकार्य केले. उत्सव संस्कृतीचा मराठी अस्मितेचा या थीमवर शोभायत्रीचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रा मार्गावर सुबक रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. यावेळी श्री पोटोबा महाराज प्रासादिक दिंडीचे सांप्रदायिक क्षेत्रातील सर्व सभासद उपस्थित होते. तसेच तरुणांनी डीजेच्या तालावर ठेका धरत नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला.यावेळी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, लहान मुले, महिला भगिनी मोठ्या संख्येने पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी झाले होते. मिरवणूकीदरम्यान संपूर्ण शहरात उत्साहाचे व आनंदाचे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गुढीपाडवा शोभायात्रेत मोरया महिला प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य अशी नेत्रदीपक मूर्ती आणि अयोध्येतील मंदिराची प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. तसेच ढोल पथक, चित्ररथ, रांगोळी पायघड्या, मर्दानी खेळ दानपट्टा लाठीकाठी - आगीचे प्रात्यक्षिके, मल्लखांबावर चित्तथरारक प्रात्यक्षिके, दिंडी वारकरी पथक, भक्ती शक्ती संच, छत्रपती शिवाजी महाराज संच तसेच पारंपरिक लोककला संच, मंगळागौर, बैलगाडी, नंद ( मंगळागौर, वासुदेव, पोतराज, वाघ्या मुरुळी, नगारा, गोंधळी, कोळी नृत्य, लावणी नृत्य ) इत्यादींचा समावेश होता.
शोभायात्रेस सुरुवात होण्यापूर्वी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील बाजारपेठेतून टू व्हीलर बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष चेतना ढोरे, उपाध्यक्षा प्रतीक्षा गट आणि मोरया महिला प्रतिष्ठानच्या सर्व संचालिका, सदस्या आणि शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शहरातील साईनाथ मित्र मंडळाच्या वतीने स्वतःहून एक चित्ररथ सहभागी केला होता. तसेच शोभायात्रा मिरवणूक मार्गावर शहरातील व्यापारी बांधवांनी पुष्पृष्टी करत शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी वडगाव शहरातील सर्वच गणेशोउत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शोभयत्रेस विशेष सहकार्य केले. उत्सव संस्कृतीचा मराठी अस्मितेचा या थीमवर शोभायत्रीचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रा मार्गावर सुबक रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. यावेळी श्री पोटोबा महाराज प्रासादिक दिंडीचे सांप्रदायिक क्षेत्रातील सर्व सभासद उपस्थित होते. तसेच तरुणांनी डीजेच्या तालावर ठेका धरत नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला.यावेळी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, लहान मुले, महिला भगिनी मोठ्या संख्येने पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी झाले होते. मिरवणूकीदरम्यान संपूर्ण शहरात उत्साहाचे व आनंदाचे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गुढीपाडवा शोभायात्रेत मोरया महिला प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे नगरसेवक विठ्ठल काटे , जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे, तज्ञ संचालक सुभाष जाधव, वडगाव शहर माजी अध्यक्ष मंगेश ढोरे, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, अशोक ढमाले, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील चव्हाण, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष गोरख ढोरे, संचालक चंदुकाका ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, युवक अध्यक्ष अतुल वायकर, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष शांताराम कुडे, नितीन भाबंळ, बारकू ढोरे, महिला अध्यक्षा पद्मावती ढोरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, नगरसेवक राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, मंगेश खैरे, नगरसेविका पुनम जाधव, माया चव्हाण, पूजा वहिले, सुरेश जांभुळकर, सचिन कडू, वडगाव बजरंग दल अध्यक्ष अमोल पगडे, दिंडी अध्यक्ष महेंद्र ढोरे, सिद्धेश ढोरे, युवराज ढोरे, गणेश जाधव, सागर म्हाळसकर,राहुल घुले, वैभव पिपंळे आदीं उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी सर्वांचे आभार मानले.





